“भाजपचा चित्रपट फ्लाॅप गेला, नव्या स्टारकास्टची लबाडी उघड होतेय”

मुंबई | सध्या राजकारणात भोंगे आणि बाॅलिवूडमध्ये केजीएफची चर्चा होताना दिसत आहे. राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे तर देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर डोस सभा होणार आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

कसदार स्टारकास्ट सोबतच कथेत सामान्य माणसाचं हित दाखवण्याचा प्रयत्न असल्याने केजीएफ आणि आरआरआरसारखे दाक्षिणात्य चित्रपट हिट होत आहेत, असं रोहित पवार म्हणाले.

पण सध्या राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या चित्रपटात राजकारण सोडून जनतेचं हित कुठंच दिसत नाही. उलट या नव्या स्टारकास्टची लबाडी रोज उघड होतेय, असा टोला रोहित पवारांनी यावेळी भाजपला लगावला आहे.

परिणामी भाजपचा सध्याचा चित्रपट फ्लॉप ठरतोय. म्हणूनच इतरांना तर सोडाच पण स्वतःच्याच 106 मधील बहुतांश लोकांनीही या चित्रपटाकडं पाठ फिरवल्याचं दिसतंय, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

त्यामुळं कदाचित पुढील चित्रपटात स्टारकास्ट बदललीही जाईल परंतु स्टारकास्ट बदलल्याने चित्रपट हिट होईलच असं नाही, त्यासाठी मुळातच कथेत दम आणि सामान्य माणूस नायक असावा लागतो, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

भाजपकडून फक्त राजकीय नाटकंच सुरूय. भाजपला नाटक करुनच ‘पुन्हा येण्याचं’ गुळगुळीत स्वप्न साकार करायचं असेल तर यानिमित्ताने का होईना भविष्यात नायक म्हणून सामान्य माणूस आपल्या कथेत दाखवला जाईल का?, असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“ये भोगी, शिक आमच्या…”; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यात मास्क सक्ती होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच म्हणाले…

हनिमूनला असं काही घडलं की नवरदेवाला घामच फुटला; बेडवर बसलेल्या नवरीचा पदर उचलला अन्…

रिलायन्स इंडस्ट्रीजची ऐतिहासिक वाटचाल; शेअर्स विक्रमी स्तरावर, देशातील पहिली कंपनी बनली

हाय रे गर्मी! देशातील 5 राज्यांना तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज