उन्नाव बलात्कार प्रकरणी प्रियांका गांधींनी सरकारला सुनावलं

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप या तरुणीवर ठेवण्यात आला आहे. तरुणीला अटक करण्यात आल्यानंतर हाच भाजपाचा न्याय आहे का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. प्रियंका यांनी याबाबत ट्विट केले आहे.

विधि महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने भाजपा नेते चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्याने खळबळ उडाली. तसेच बलात्काराचा आरोप झालेले भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या विधी महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थिनीला एसआयटीने अटक केली. तिच्यावर चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यावरून प्रियंका गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडित तरुणाच्या वडिलांची हत्या करण्यात आली. काकांना अटक करण्यात आली. त्यानंतर जनक्षोभाचा उद्रेक झाला आणि 13 महिन्यांनंतर आरोपी आमदाराला अटक करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शाहजहानपूर प्रकरणात पीडितेला अटक करण्यात आली आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यात आला, असा आरोप देखील प्रियंका गांधी यांनी ट्वीटमध्ये केला आहे. 

 

महत्वाच्या बातम्या-