मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका बड्या नेत्याच्या नि.धनानं राजकीय वर्तुळात हळहळ

मुंबई | जवळपास वर्षभरापूर्वीपासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. लाखो लोकांनी या महामा.रीचा संसर्ग झाल्यानं आपले प्रा.ण गमवले आहेत. मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांचे देखील कोरोनामुळे नि.धन झालं आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे.

पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचे आज कोरोनामुळे नि.धन झाले आहे. संजय भोपी यांच्या नि.धनाने राजकीय वर्तुळात एकंच शो.ककळा पसरली आहे. अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियावरून संजय भोपी यांना श्र.द्धांजली वाहिली आहे.

कोरोनाच्या काळात अनेक लोकांवर उपासमा.रीची वेळ आली होती. यावेळी स्वतः लोकांपर्यंत पोहोचून भोपी यांनी गरजूंना मदत केली होती. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय उत्तम काम केलं होतं. मात्र, या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली.

कोरोनाची लागण झाल्यानंतर संजय भोपी यांना उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळी भोपी कोरोनामधून बरे झाले होते. त्यांना घरी देखील सोडण्यात आलं होतं. परंतु घरी सोडल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा भोपी यांची प्रकृती खालावली.

संजय भोपी यांच्या प्रकृतीची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळताच त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलं. त्यांनी स्वतः भोपी यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. गेल्या काही दिवसांपासून संजय भोपी हॉस्पिटलमध्ये मृ.त्यूशी झुंज देत होते. मात्र, आज अखेर भोपी यांची प्रा.णज्योत मावळली.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना वि.षाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यांत कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. देशात कोरोना लसीकरण चालू झालं आहे. कोरोना लस सर्वसामान्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणं हे दिलासा देणारं आहे.

देशभरातील 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जात आहे. सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत आहे. मात्र, खासगी केंद्रावर काही शुल्क घेऊन लस दिली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शहरांत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

सचिन वाझे प्रकरणात रवी राणांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

सचिन वाझे प्रकरणात रवी राणांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

ध.क्कादायक! 6 दिवस घरात कों.डून ठेवून शिक्षिकेनं केलं…

नितीन गडकरींची मोठी घोषणा, येत्या वर्षभरात सर्व टोलनाके…