वॉशिंग्टन | सापाचं नाव जरी ऐकलं तरी आपल्यापैकी अनेकांचा थरकाप उडतो. वि.षारी सापाच्या एका दंशामुळे माणूस जिवानिशी जातो. यामुळे प्रत्येकाच्याच मनात त्याच्याविषयी भी.ती असते. मात्र, काही लोक असे असतात ज्यांना या भयंकर प्राण्याबरोबर मस्ती करायला खूप आवडतं. मात्र, काहीवेळा हे त्यांच्या चांगलंच अंगलट येतं.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका अजगराने एका व्यक्तीच्या डोळ्यांवर ह.ल्ला केला आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या डोळ्यांमधून रक्त येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये जो व्यक्ती दिसत आहे त्या व्यक्तीच नाव निक असं आहे. निकच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सापांबरोबरचे अनेक व्हिडीओ त्याने शेअर केले आहेत. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ देखील निकने स्वतः शेअर केला आहे.
निक द रँग्लर या यु ट्युब चॅनेलवरून निकने हा व्हिडीओ शेअर केला आहे. फ्लोरिडा शहरातील एव्हरग्लँडस नॅशनल पार्कमध्ये निक एका अजगराबरोबर व्हिडीओ शूट करत होता. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, त्याने हातामध्ये एक भलामोठा अजगर पकडलेला आहे.
तो या व्हिडिओमध्ये अजगराविषयी माहिती देत आहे. हा अजगर वि.षारी नसतो, असं तो सांगत आहे. यावेळी हा भलामोठा अजगर निकवर ह.ल्ला करण्याचे अनेक प्रयत्न करतो. हा अजगर वि.षारी नसल्याने निक देखील बेसावध दिसत आहे.
मात्र, निक या अजगराविषयी माहिती देत असतानाच अजगर त्याच्या डोळ्यांवर अचानक ह.ल्ला करतो. सुदैवाने निकच्या डोळ्याला कोणतीही ईजा होत नाही. मात्र, निकच्या डोळ्यांच्या वरच्या बाजूला हा भलामोठा अजगर दंश करतो आणि तिथून रक्त वाहू लागतं.
दरम्यान, निक एक सर्पमित्र आहे. तो लोकांच्या मनातील सापांविषयी भीती कमी करण्याचा आणि सापांबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने सोशल मीडियावर याच्याशी संबंधित अनेक व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका बड्या नेत्याच्या नि.धनानं राजकीय वर्तुळात हळहळ
सचिन वाझे प्रकरणात रवी राणांचा खळबळजनक दावा, म्हणाले…
सचिन वाझे प्रकरणात रवी राणांचा खळबळजनक दावा, म्हणाले…
ध.क्कादायक! 6 दिवस घरात कों.डून ठेवून शिक्षिकेनं केलं…