मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द

मुंबई | मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याबाबत घेतलेला निर्णय मुंबई महापालिकेने रद्द केला आहे. हृदयासंबंधीच्या धोक्याचे कारण सांगत बीएमसीने हा निर्णय मागे घेतला आहे.

कोरोना विषाणूंचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कालच हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. सरसकट लाखभर नागरिकांना हा डोस देण्याऐवजी आता फक्त काहीशे जणांनाच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या दिल्या जाणार आहेत.

‘कोरोना’ची लागण न झालेल्या मात्र क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती, पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांनाच हा डोस दिला जाणार आहे. धारावीतील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क व्यक्तींनाही हा डोस दिला जाणार आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा डोस देण्यासंबंधी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल माहिती दिली होती. वरळी आणि धारावी या ‘कोरोना हॉटस्पॉट’ असलेल्या परिसरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महापालिका हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देणार होती.

महत्वाच्या बातम्या –

-फक्त लॉकडाऊनने कोरोना जाणार नाही- राहुल गांधी

-राहुल कुलकर्णीला अटक करून महाराष्ट्र सरकारने चूक केली- रवीश कुमार

-“मुख्यमंत्र्यांचे काम चांगलं, वेडंवाकडं करायचा जर कुणी प्रयत्न केला तर गाठ मनसेशी आहे”

-“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय चांगलं काम करत आहेत”

-विनय दुबेला मी ओळखत नाही – गृहमंत्री अनिल देशमुख