फक्त लॉकडाऊनने कोरोना जाणार नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली | फक्त लॉकडाऊनने कोरोना जाणार नाही तर देशात रँडम चाचण्या मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे, हेच करोनाशी लढण्याचे खरे शस्त्र आहे, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला.

कोरोनाशी लढण्यासाठी ज्या गतीने राज्यांना पैसे पोहोचले पाहिजेत, तसे पोहोचत नाहीत. केंद्र सरकारने हे ध्यानात घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करावी, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

सरकारनं गरीबांसाठी आर्थिक मदतीचं पॅकेज जाहीर करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला. सध्या आपण एका गंभीर स्थितीमध्ये आहोत, अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजुला ठेवून एकत्र यायला हवं, असं ते म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम राज्यांना ताकद देण्याचं आहे, राज्यांची पैसे पुरवण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या शक्तीचा योग्य पद्धतीनं वापर करायला हवं. यासाठी राज्यांना अधिक अधिकार देण्याची गरज आहे, असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या –

-राहुल कुलकर्णीला अटक करून महाराष्ट्र सरकारने चूक केली- रवीश कुमार

-“मुख्यमंत्र्यांचे काम चांगलं, वेडंवाकडं करायचा जर कुणी प्रयत्न केला तर गाठ मनसेशी आहे”

-“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय चांगलं काम करत आहेत”

-विनय दुबेला मी ओळखत नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

-मुंबईचं इटली होणार, आपल्याला खंबीर नेतृत्वाची गरज- रंगोली चंडेल