दसरा मेळाव्याबाबत मोठी बातमी; शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याला..

मुंबई | शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. एक मूळ शिवसेना आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा गट. आता या दोनही गटांत तुफान खडाजंगी सुरु आहे.

दसरा मेळावा ही शिवसेनेची ओळख आहे. आणि गेली अनेक वर्षे शिवसेना दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर दसरा मेळावा घेत आली आहे. यंदा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात आला आहे.

कारण, शिंदे यांनी मूळ शिवसेना म्हणजे आपला गट, असा दावा केला असून आता त्यांनी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमांवर आपला अधिकार देखील सांगितला आहे. त्यांनी देखील दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

शिवसेनेकडून सालाबादप्रमाणे दसरा मेळावा दादरला घेण्यासाठी महानगरपालिकेला अर्ज करण्यात आला होता. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून देखील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरच मेळावा घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.

हे दोनही अर्ज पालिकेच्या विचाराधीन होते. शिवसेनेने दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाची पायरी चढली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गट आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट या दोघांना देखील परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करत, ही कार्यवाही करण्यात आली आहे.

पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारण्यात आली आहे. आता शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सर्वांचे लक्ष आहे. कारण शिवसेनेला आता तेवढाच एक आधार आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘भाजपचा एकनाथ शिंदे गटाला दणका’

“हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देखील आमदार नाही” वक्तव्यावर मनसेचे शरद पवारांना सडेतोड उत्तर

‘मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेची नवी खेळी’

रामदास कदमांच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाल्या, तुमच्या बापाच्या…

दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला मोठा दणका देण्याचा एकनाथ शिंदेंचा डाव