भाजपच्या मिशन ‘मुंबई’मध्ये आता पंतप्राधान मोदी उतरले

मुंबई | सर्व राजकीय पक्षांचा डोळा मुंबई महानगरपालिकेवर (BMC) आहे. शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून काढून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे सरसावले आहेत.

शिंदे यांना भाजपचा छुपा आणि उघड पाठिंबा देखील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या दिल्लीला केद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आहेत. यावेळी मुंबई निवडणुकांची देखील चर्चा होणार आहे.

शिंद्यांनी काल गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेतली होती. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यात ते काही केंद्रीय मंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत. यावेळी ते मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) पार्श्वभूमीवर चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.

दिल्लीत महाराष्ट्र सदनात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण देखील केले. त्यानंतर त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली.

त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत दिल्ली उतरणार, असे चित्र तयार झाले आहे. अमित शहा हे लवकरच मुंबई दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –

दसरा मेळाव्याबाबत मोठी बातमी; शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याला..

‘भाजपचा एकनाथ शिंदे गटाला दणका’

“हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देखील आमदार नाही” वक्तव्यावर मनसेचे शरद पवारांना सडेतोड उत्तर

‘मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेची नवी खेळी’

रामदास कदमांच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाल्या, तुमच्या बापाच्या…