“चिनी उत्पादनांवरील बंदीने चीनच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही”

नवी दिल्ली | भारत आणि चीनमधील संघर्षानंतर देशभरातून चीनचा तीव्र विरोध केला जातोय. यामुळे चीनच्या वस्तूंवर देखील बंदी घालण्याची मागणी होत आहे, मात्र चिनी वस्तूंवर बंदी जरी घातली तरी त्याचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार नाही, असं मत काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मांडलं आहे.

पी. चिदंबरम यांच्या सांगण्यानुसार, “चिनी उत्पादनांवर बंदी घातल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. त्याऐवजी भारत स्वयंपूर्ण कसा होऊ शकतो यावर भर दिला पाहिजे. इतर देशांशी असलेले संबंध आपण तोडता कामा नये.”

चीनचा आपल्याशी होणारा व्यापार हा जागतिक पातळीवर होणाऱ्या व्यापारी उलाढालीच्या तुलनेत नगण्य आहे. भारताने चीनी वस्तूंवर बंदी न घालता जागतिक पुरवठा साखळीत आपलं स्थान कायम ठेवलं पाहिजे, असंही पी. चिदंबरम यांनी सांगितलं.

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर चीनला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी भारताने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असा निर्णय घेण्यात आला. यामध्ये चीनी उत्पादनं न वापरण्याचे निर्देश देण्यात आलेत.

महत्वाच्या बातम्या-

-चीनला धडा शिकवण्यासाठी भारताचा ‘प्लॅन बी’ तयार, वापर करणार?

-…म्हणून राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतीये, आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा

-येत्या 24 तासांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

-‘आम्ही सर्व एक आहोत’; स्वाभिमानीच्या नेत्यांची अखेर गळाभेट

-अंदमान-निकोबार बेटांवर विशेष लक्ष द्या, नौदलाला सतर्कतेचा इशारा