चीनला धडा शिकवण्यासाठी भारताचा ‘प्लॅन बी’ तयार, वापर करणार?

नवी दिल्ली | भारत चीन संघर्षानंतर चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने ‘प्लॅन बी’चा विचार केला आहे. भारताच्या या प्लॅन बी मध्ये तैवानशी सांस्कृतिक संबंध आणि संपर्क पातळीवर मदत वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवाय तैवानला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा देणार्‍या देशांच्या मागे भारत उभा राहणार आहे.

याबाबत तैवानशी कोणताही करार किंवा संपर्क करण्यात आलेला नाही. मात्र, येणाऱ्या दिवसांमध्ये भारत या प्रकरणी अमेरिकेच्या धोरणाला संपूर्ण पाठिंबा देऊ शकतो, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चीन जर पूर्वीच्या करारांनुसार वागला नाही तर भारत अनेक स्तरांवर वेढा वाढवेल. यासाठी अनेक मुत्सद्दी पर्यायांचा विचारही केला जात असल्याचं सांगण्यात आलंय.

चीनने उचललेल्या पावलांमुळे भारत दुखावला गेलाय. या घटनेनंतर धोरणात्मक पातळीवर निश्चितच बदल होतील. या बदलाचे पडसाद तिबेटच्या भारत धोरणावरही पडतील असं सूत्रांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतीये, आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा

-येत्या 24 तासांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

-‘आम्ही सर्व एक आहोत’; स्वाभिमानीच्या नेत्यांची अखेर गळाभेट

-अंदमान-निकोबार बेटांवर विशेष लक्ष द्या, नौदलाला सतर्कतेचा इशारा

-‘वरुण, सिद्धार्थपेक्षा सुशांतचं भविष्य उज्वल असेल’; इम्रान हाश्मीचा ‘तो’ व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल