‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

मुंबई | आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगत आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना 1100 टक्क्यांहून अधिक नफा दिला. ट्रॅक्टर उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीने आयशर मोटर्सचा स्टॉक खरेदी केल्यानंतर विसरलेल्यांना गुंतवणुकीचा मोठा परतावा दिला.

मोटर्सचा स्टॉक 20 वर्षात 2.43 रुपयांवरून 2712 रुपयांवर गेला. दुसऱ्या शब्दांत या स्टॉकने दोन दशकात 1116 पट वाढ नोंदवली.

आयशर मोटर्सचा स्टॉक गेल्या 6 महिन्यांत सुमारे 11 टक्क्यांच्या वाढीसह 2447.25 रुपयांवरून 2712 रुपयांपर्यंत वाढला. त्याच वेळी गेल्या एका वर्षात हा स्टॉक सुमारे 24 टक्क्यांनी वाढला.

गेल्या 1 वर्षात हा शेअर 2192.85 रुपयांवरून 2712 रुपये प्रति शेअर झाला. गेल्या दीड वर्षात जवळपास 115 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला. एप्रिल 2020 पासून आतापर्यंत हा शेअर 1268 रुपयांवरून 2712 रुपयांपर्यंत वाढला.

ऑटो कंपनी आयशर मोटर्सचा शेअर गेल्या 10 वर्षांत 174 रुपयांवरून 2712 रुपयांपर्यंत वाढला. यादरम्यान तो 15.60 पटीने वाढला. त्याच वेळी गेल्या 20 वर्षांमध्ये हा स्टॉक 2.43 रुपयांवरून 2712 रुपयांपर्यंत वाढला. या काळात या ऑटो स्टॉकमध्ये 1116 पट वाढ नोंदवण्यात आली.

आयशर मोटर्सच्या स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने 10,000 रुपये गुंतवले असते, तर आज ते 11,100 रुपये झाले असते. जर 1 वर्षापूर्वी 10,000 रुपये गुंतवले असते तर ते आज 12,400 रुपये झाले असते.

दरम्यान, दोन दिवसांच्या वाढीनंतर, कमजोर ग्लोबल मार्केट संकेतांमुळे बाजारात मंगळवारी प्रॉफिट बुकिंग झालं. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी लाल चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स आज 112.16 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांनी घसरून 60,433.45 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 24.20 अंकांनी किंवा 0.13 टक्क्यांनी घसरुन 18,044.30 वर बंद झाला.

महत्वाच्या बातम्या- 

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर 

“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं! राज्यभरातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

रोहित शर्मा भारताचा नवा कर्णधार; आयपीएलमध्ये झळकलेल्या ‘या’ चार युवा खेळाडूंची संघात वर्णी