‘बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई’; अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल

मुंबई | मुंबई क्रुझ प्रकरणावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. कालच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोपांची झोड केली.

नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शाब्दिक युद्धात आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्वीट करत नबाव मलिकांवर हल्लाबोल चढवला आहे.

‘बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई’ अशी कविता करत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांवर हल्लाबोल केला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बिगड़े नवाब यांनी प्रेस कॉन्फरन्सवर, प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि प्रत्येक वेळी खोट्या गोष्टी सांगितल्या. तसेच यांचं लक्ष्य फक्त आपल्या जावयाला आणि काळ्या पैशाला वाचवणे हेच आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी नवाबांवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मलिकांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत ड्रग्ज स्मगलरचा फोटो शेअर केला होता. एवढंच नाही तर या फोटोसोबत नवाब मलिक यांनी, ‘आज भाजप आणि ड्रग्स पेडलर यांच्यातील संबंधांवर चर्चा करूया’, असं लिहिलं होतं.

यावरही अमृता फडणवीसांनी ‘बिगडा नबाव’ म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. तेव्हापासून हा वाद आणखीनच चिघळत चाललेला पहायला मिळत आहे.

मलिकांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर काल पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली. याशिवाय देवेंद्र फडणवीसांनी नबाव मलिकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. फडणवीसांची पत्रकार परिषदेत संपताच मलिकांनी सूचक ट्विट करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

फडणवीसांची पत्रकार परिषद संपताच मलिकांनीही पाठोपाठ पत्रकार परिषद घेतली आहे. आजही मलिक पत्रकार परिषद घेणार आहेत. आता आज मलिक कोणता नवा गोप्यसफोट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “प्रभू श्रीराम हे दशरथाचे पुत्र नाहीत, ते तर…”

“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं! राज्यभरातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

रोहित शर्मा भारताचा नवा कर्णधार; आयपीएलमध्ये झळकलेल्या ‘या’ चार युवा खेळाडूंची संघात वर्णी