लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर, डाॅक्टरही चिंतेत

मुंबई | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने मुंबईत थैमान घातलं आहे. अशातच बाॅलिवूडमधील अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं.

अशातच गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची बाधा झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपासून लतादीदी आयसीयूमध्ये होत्या.

लतादीदींना मुंबईतील ब्रीच काँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच कोरोनाबरोबरच लतादीदींना न्युमोनिया झाल्याची माहिती देखील समोर आली होती.

उपचारांना लतादीदी अल्पशा प्रतिसाद देत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अपेक्षेइतकी त्यांच्यात सुधारणा होत नसल्याचं दिसून येत आहे.

न्युमोनियाच्या त्रासामुळे आता डाॅक्टर देखील वेट अँड वाॅचच्या भूमिकेत आहेत. 2019 मध्ये देखील लतादीदींना न्युमोनिया झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता.

काही दिवसांपूर्वी लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

मात्र, आता लतादीदींच्या प्रकृतीवर डाॅक्टर देखील चिंतेत दिसत आहेत. त्यामुळे आता चाहते लतादीदींसाठी प्रार्थना करत असल्याचं दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

खास फिचर्ससह BMWची आकर्षक SUV लाँच; फक्त एकदा चार्ज केली की…

 मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘या’ राज्यात लागणार संपूर्ण लाॅकडाऊन

‘ही’ लस ठरतीये ओमिक्राॅनवर प्रभावी, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

 सेक्सनंतर डोकं दुखत असेल तर गांभिर्याने घ्या, जीवावरही बेतू शकतं

शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”