नागपूर | अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊत हनुमान चालीसा पठन करणार होते. मात्र, आज राणा दामपत्याने आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.
घंटावादी हिंदूत्ववादी स्वत:ला सत्यवादी समजून बंटी आणि बबली मुंबईत आले. आंदोलन मागे घेतला म्हणजे त्यांनी पळ काढला. तुम्ही पळपुटे आहात, असं संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान आमचे देखील आहेत. त्यांच्या दौऱ्याला गालगोट लावू नये, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं राऊत म्हणाले. बोगस लोक नाटकी करत आहेत. पंतप्रधानांच्या संरक्षणसाठी शिवसैनिक आहे. अयोद्ध्या दौऱ्याला यांचा विरोध होता, असंही राऊत म्हणाले.
आमचं हिंदू्त्व गदाधारी आहे. हे दीड शहाणे आहे त्यांना आम्ही सांगतोय शिवसैनिकांच्या नादी लागू नका. आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशारा राणा यांनी दिला आहे.
सकाळी 4ला उठून राष्ट्रपती लागवट उठणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रपती राजवट शिकवू नये, असंही ते म्हणाले आहेत. बोगस सर्टीफिकेटवर निवडणून येणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाभारत नव्याने घडवण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल. अमरावतीला मी स्वत: जाणार. पुन्हा लोकसभेत जाऊन दाखवा, असा टोला राऊतांनी लगावला आहे. शिवसैनिकांच्या नादात लागलं तर त्यांनी त्यांच्या गौऱ्या रचून यावं, असंही राऊत म्हणाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! अखेर राणा दाम्पत्याचं आंदोलन मागे; दिलं ‘हे’ महत्त्वाचं कारण
“उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”
‘मुख्यमंत्र्यांवर किती हल्ले झाले तरी त्यांनी….’; सुप्रिया सुळेंकडून कौतुकांचा वर्षाव
‘उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला शनी’; राणा दाम्पत्यांचा हल्लाबोल
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ! ‘या’ शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार