नुकसान भरपाई देताना नागरिकांना विश्वासात घ्या; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे. परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या. संकट मोठे आहे, आपण सर्व कोरोनामध्ये दिवस रात्र काम करीत आहात त्याचे निश्चितच कौतुक आहे. विशेषत: मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये हलविलेल्या नागरिकांना सोडतांना त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या नशिबामुळे चक्रीवादळाचा जोर ओसरला. आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल. पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत पण आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला खूप वर्षांनी असे वादळ आले. त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारी ठेवावी लागेल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.

दुसरीकडे कालच्या निसर्ग वादळाचा कोकण किनारपट्टीला सगळ्यात जास्त पटका बसला. अनेक ठिकाणची घरं जमीनदोस्त झाली तर पिकांचंही मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेलं फळं निसर्गने एका झटक्यात भुईसपाट केली.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-संदीप क्षीरसागरांचं स्तुत्य पाऊल; शिवारात सापडलेल्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं

-“राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रम नको, मात्र ही एक गोष्ट करा”

-“तुम्ही कोरोनाचा आलेख खाली आणायचा सोडून अर्थव्यवस्थेचाच आणला”

-मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

-केरळात गर्भार हत्तीणीचा मृत्यू; भाजप नेत्या मेनका गांधी राहुल गांधींवर संतापल्या