इंदुरीकर महाराज आता बोलताना जरा जपून… ! नाहीतर

मुंबई | आपल्या किर्तानातून भल्याभल्यांची भंबेरी उडणारे आणि तुफान फॅन फोलोविंग असणारे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्याच किर्तनातील वक्तव्याने गोत्यात आले आहेत.

ओझर येथे झालेल्या किर्तनात सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असा दावा इंदुरीकरांवर महाराजांनी केला होता. मात्र महाराजंना केलेलं वक्तव्य  म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. PCPNDT कायद्यानुसार कलम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी त्यांच्या किर्तनातून अनेकदा सामाजिक, राजकीय क्षेत्रांमधील ज्वलंत विषयावर कीर्तन करुन अनेकांची मनं जिंकली आहेत. मात्र आता गर्भलिंग निदानाबाबत वक्तव्य केल्या प्रकरणी इंदोरीकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराजांची किर्तनं यू ट्युबसह सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतात. पण सध्या महाराजांचा वादग्रस्त व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-व्हॅलेंटाइनला नेहा कक्कर अडकणार लग्नबंधनात???

-धक्कादायक! ‘आप’ आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार एकाचा दुर्दैवी अंत

-दिल्ली विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या तब्बल ‘इतक्या’ उमेदवाराच डिपॉझिट जप्त

-थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटू द्या; रुपाली चाकणकर भडकल्या

-भाषणांना गर्दी झाली म्हणजे मतं मिळत नसतात; शरद पवारांनी काढला राज ठाकरेंना चिमटा