व्हॅलेंटाइनचा मुहूर्त साधत नेहा कक्कर अडकणार लग्नबंधनात??

मुंबई | प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि गायक आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या चर्चा ‘इंडियन आयडॉल 11’ शोमध्ये  नेहमीच चालू असल्याचं दिसून येत. या शोमध्ये नेहा जज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि आदित्य होस्टिंग करताना दिसून येतो. त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधान आलं असताना आदित्यचे वडील आणि प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

‘इंडियन आयडॉल ११’ या शोमध्ये आत्ता नेहा आणि आदित्यच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 14 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार असल्याचंही सांगितलं जात आहे. याचसंदर्भात गायक आणि आदित्यचे वडिल उदित नारायण यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर ही फक्त एक अफवा आहे असं त्यांनी म्हटलं. शोच्या टीआरपीसाठी ही अफवा पसरवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

‘आम्ही आदित्यच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहोत आणि जर या अफवा सत्यात उतरल्या तर मला फार आनंद होईल’, असंही उदित नारायण यांनी सांगितल आहे. नेहा एक चांगली मुलगी आहे. पण अजून यासंदर्भात माझं आदित्यशी बोलणं झालं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘इंडियन आयडॉल 11’ या शोमध्ये आदित्यचे आईवडिल आले होते आणि ते आदित्य आणि नेहाचं लग्न ठरवण्यासाठी आले असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आदित्य आणि नेहाच्या लग्नाच्या चर्चां अजून जोमानं सुरू झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-धक्कादायक! ‘आप’ आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार एकाचा दुर्दैवी अंत

-दिल्ली विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या तब्बल ‘इतक्या’ उमेदवाराच डिपॉझिट जप्त

-थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटू द्या; रुपाली चाकणकर भडकल्या

-भाषणांना गर्दी झाली म्हणजे मतं मिळत नसतात; शरद पवारांनी काढला राज ठाकरेंना चिमटा

-‘आप’च्या विजयाने अरविंद केजरीवालांनी जन की बात देशाला दाखवून दिली- उद्धव ठाकरे