केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; लवकरच मिळणार ‘ही’ मोठी भेट!

नवी दिल्ली | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. केंद्र सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करू शकते.

केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ दिसून येते.

होळीच्या सणापूर्वी नोकरदारांना मोठी बातमी मिळू शकते. केंद्र सरकार मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करू शकते. त्यामुळे होळीच्या सणाच्या आसपास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.

केंद्र सरकार मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करू शकते. त्यामुळे होळीच्या सणाच्या आसपास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.

दरम्यान, केंद्र सरकार लवकरच जानेवारी 2022 साठी महागाई भत्ता वाढवू शकते अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. सरकार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करणार आहे.

महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ झाल्याने ती 31 टक्क्यांवरून 34 टक्के होईल. त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे. मार्च महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या- 

“लता मंगेशकर हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी होत्या म्हणून…” 

“काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर आल्यास झोडून काढू” 

तीन दिवस शाळा-काॅलेज बंद; हिजाब वादानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय 

लता मंगेशकर यांचं इंग्रजी गाणं ऐकलं का?, महेश काळेंनी शेअर केला व्हिडीओ

 “अजित पवारांनी धरणाची जागा देखील शिल्लक ठेवली नाही”