“लता मंगेशकर हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी होत्या म्हणून…”

मुंबई | भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. त्यानंतर त्यांचावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्य संस्कार पार पडले. यावेळी दिल्लीपासून अनेक दिग्गज व्यक्तींनी त्यांना निरोप देण्यासाठी मुंबईत उपस्थिती दाखवली.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सरकारने 2 दिवसांचा दुखवटा जाहिर केला होता. तसेच सोमवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. अनेक राजकीय कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले.

राजकीय दुखवटा सुरू असतानाच काल सोमवारी रोजी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाद्याक्ष जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाविरुद्ध भाजपकडून टीका केली जात आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी राज्याचे मंत्रीच मुख्यमंत्र्यांचे आदेश मानत नाहीत का ? असा सवाल उपस्थित केला. तसेच लता मंगेशकर हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी होत्या म्हणून अश्या प्रकारे अपमान केला जातो आहे का ? हा मुद्दा देखील उपस्थित झाला असल्याचं म्हटलंय.

राज्यात दुखवटा असून सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले गेले आहेत. तसेच सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली असून, अश्या कार्यक्रमात जबाबदार मंत्र्यांनी जाणं योग्य आहे का?, असा प्रश्न कंबोज यांनी केला.

महत्वाच्या बातम्या- 

“काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर आल्यास झोडून काढू” 

तीन दिवस शाळा-काॅलेज बंद; हिजाब वादानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय 

लता मंगेशकर यांचं इंग्रजी गाणं ऐकलं का?, महेश काळेंनी शेअर केला व्हिडीओ

 “अजित पवारांनी धरणाची जागा देखील शिल्लक ठेवली नाही”

 “मंगेशकर कुटुंबीयांनी परवानगी दिल्यास ‘या’ शहरात लतादीदींचं भव्य स्मारक उभारू”