कोरोनाचा हाहाकार! केंद्राने जारी केल्या ‘या’ नव्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने देशात पुन्हा एकदा थैमान घालायला सुरूवात केली आहे. कोरोबाधितांच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता चिंता व्यक्त केली जात आहे.

देशात कोरोनाबाधिांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना  केंद्र सरकारने कोरोना रूग्णांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

ज्या लोकांना कोरोना झाला आहे व जे लोक घरीच उपचार घेत आहेत, अशा रूग्णांसाठी केंद्र सरकारने या महत्वाच्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

कोरोना रूग्णाला विलगीकरणादरम्यान सलग तीन दिवस ताप आला नाही तर तो रूग्ण कोरोना निगेटिव्ह मानला जाणार आहे. म्हणजेच, जर तुम्हाला कोरोना होऊन 7 दिवस झाले असतील आणि त्यातील सलग 3 दिवस ताप नसेल तर तो रूग्ण कोरोनामुक्त समजला जाणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, होम आयसोलेशनचा कालावधी हा 15 दिवसांचा होता. या 15 दिवसानंतर अनेकांना पुन्हा एकदा कोरोना चाचणी करावी लागत होती.मात्र, या होम आयसोलेशनच्या कालावधीत आता बदल करण्यात आला आहे.

होम आयसोलेशनचा कालावधी आता 7 दिवसांचा करण्यात आला आहे. यातही जर सलग 3 दिवस ताप नसेल तर आठव्या दिवसापासून त्या व्यक्तीला कोरोना चाचणी करणं बंधनकारक नसणार आहे.

ऑक्सिजनची पातळी आता 93 पर्यंत जरी खाली गेली तरी चिंतेची गरज नसल्याचं नव्या गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आलं आहे. घरातल्या बंद खोलीत किंवा तुम्हाला श्वसनाचा त्रास नसेल तर 93 ही ऑक्सिजनची सामान्य पातळी समजली जाईल.

दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे केंद्राच्या कोरोना गाईडलाईन्समध्ये इतकी शिथिलता दिल्याचं बोललं जात आहे. देशात आढळून आलेल्या कोरोना रूग्णांमध्ये 60 टक्के रूग्ण हे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या बहुतांश रूग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळेच कोरोना गाईडलाईन्समध्ये इतकी शिथीलता देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील ओमिक्रॉन रूग्णसंख्येबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“हेडमास्तर कुठं गेेले? तो दरारा कुठंय?”, ‘त्या’ कारवाईनंतर चित्रा वाघ संतापल्या

‘या’ 5 पेनी स्टॉक्सने दिले जबरदस्त रिटर्न्स; फक्त 5 दिवसात गुंतवणूकदार मालामाल

Corona Alert! गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ; वाचा आकडेवारी

“नाना पटोले यांच्यावर कारवाई करा, त्यांना…”, चंद्रकांत पाटलांची आक्रमक मागणी