कझाकीस्तानात तणावाचं वातावरण, सरकारने दिला ‘तो’ हिटलरी हुकूम अन्…

नवी दिल्ली | कझाकीस्तानमध्ये (Kazakhstan) रशियन सैन्य दाखल झाल्यानंतरही हिंसक निदर्शने थांबत नसल्याचं दिसतंय. अशातच आता कझाकीस्तानात तणावाचंं वातावरण निर्माण झालंय.

आंदोलकांच्या सुरक्षा दलांनी शुक्रवारी कझाकीस्तानच्या मुख्य शहर असलेल्या अल्माटीच्या रस्त्यांवर पुन्हा ताबा मिळवला. कझाकस्तानला उठाव संपवण्यास मदत करण्यासाठी रशियाने शांतीरक्षक पाठवल्यानंतर एक दिवस हिंसाचार सुरूच राहिल्याचं पहायला मिळालं.

लोकांनी रस्त्यावर आग लावली आणि राडा घातला आणि सार्वजनिक इमारतींची देखील तोडफोड केली. यादरम्यान गोळीबाराचे आवाजही ऐकू आले. त्यामुळे कझाकिस्तानचं सरकार देखील खडबडून जागं झालं.

हिंसाचारात आतापर्यंत 18 पोलिसांसह 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांकडून मिळाली आहे. त्यानंतर कझाकचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट टोकतावे यांनी थेट आदेश सोडले आहेत.

हिंसक निदर्शने पाहून कझाकचे राष्ट्राध्यक्षांनी देशव्यापी बंडखोरी मोडून काढण्यासाठी आपल्या सैनिकांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

आंदोलकांनी अध्यक्षांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि अल्माटीच्या महापौरांचे निवासस्थान ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना इमारतीला आग लावण्यात आली. त्यामुळे आंदोलक चांगलंच चिघळत असल्याचं दिसतंय.

कझाकीस्तानला तीन दशकांपूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वात वाईट निदर्शनांचा सामना करावा लागत आहे. सरकारी इमारती ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रपतींनी आंदोलकांच्या कारवायांना दहशतवादी ठरवलं आहे.

दरम्यान, या हिंसाचाराचे परिणाम थेट भारतावरही होण्याची शक्यता आहे. हा हिंसाचार असाच वाढत राहिला तर कच्च्या तेलाच्या किंमतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील ओमिक्रॉन रूग्णसंख्येबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

‘या’ 5 पेनी स्टॉक्सने दिले जबरदस्त रिटर्न्स; फक्त 5 दिवसात गुंतवणूकदार मालामाल

Corona Alert! गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ; वाचा आकडेवारी

“नाना पटोले यांच्यावर कारवाई करा, त्यांना…”, चंद्रकांत पाटलांची आक्रमक मागणी

नाचत नाचत आला अन् आमदाराला कानाखाली मारून गेला; व्हिडीओ तुफान व्हायरल