कोरनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय देशातली रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद

नवी दिल्ली |  कोरनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातली रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कॉरेनटाईनचा शिक्का हातावर असलेले प्रवासी रेल्वेमधून प्रवास करताना आढळून आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग अधिक फैलू नये, यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

प्रवासी रेल्वेगाड्या बंद राहणार असल्या तरी मालगाड्या चालू राहणार आहेत. तसंच मेट्रो सिटीमध्ये लोकल आणि मेट्रो 22 तारखेपासून बंद राहणार असल्याची चर्चा देखील शासन स्तरावर चालू आहे.

दरम्यान, संपूर्ण देशात लॉकडाऊन होऊ शकतं, हे रेल्वेने घेतलेल्या निर्णयाने अधोरोकित झालं आहे. तसंच पब्लिक ट्रान्सपोर्टेशन येत्या काही दिवसांत बंद राहू शकतं, अशीही शक्यता वर्तवली जातीये.

महत्वाच्या बातम्या – 

-मोठी बातमी… मुंबईतली लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत बंद

-आपल्या पाळीव प्राण्यांचा त्याग करु नका, हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचं आवाहन

-गाडगेबाबांनी सांगितलेला माणुसकीचा धर्म हाच खरा धर्म; संजय राऊत यांचा प्रबोधनात्मक अग्रलेख

-औरंगाबादकरांनी सोडला सुटकेचा निश्वास, कारण ‘त्या’ महिलेनं केली सात दिवसात कोरोनावर मात

-सावधान ! महाराष्ट्रात कोरोनाने घेतला दुसरा बळी