छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री व्हावेत; भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांची इच्छा

नाशिक | राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री व्हावेत, अशी इच्छा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांनी व्यक्त केली. छगन भुजबळ आणि वसंत गीते यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील मोठे प्रस्थ आहे. ते अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व आहेत. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.आता त्यांनी नाशिकचे पालकमंत्री म्हणून नेतृत्व करावं, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

भुजबळ नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत. अशी माझी इच्छा आहे. या भेटीत छगन भुजबळ यांना सदिच्छा दिल्या आणि त्यांचं अभिनंदन केलं. त्यांचे आशीर्वाद घेण्याकरीता भेट घेतली, असं वसंत गीते यांनी या भेटीनंतर सांगितलं.

वसंत गीते यांनी 2009 साली पहिल्यांदाच मनसे या पक्षाकडून निवडणूक लढवली. त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचं तोंड पहावं लागलं. म्हणून त्यांनी भाजपचा रस्ता निवडला. त्यांनी भाजप प्रदेशउपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. त्यानंतर आता छगन भुजबळ  यांना दिलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-