“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”

मुंबई | दोन वर्षे मी जेलमध्ये राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही आणि तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामुळे डिप्रेशन येतं का?, असा प्रश्न विचारत डिप्रेशन न घेता अभ्यास करण्याचा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

आज लागलेल्या निकालाचा धागा पकडत छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जेलमधील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला.

दोन वर्षे मी जेलमध्ये राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही. मग  तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामुळे डिप्रेशन येत का? डिप्रेशन न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

दरम्यान, राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हती.

यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती.

अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आलाय. यावर्षी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

दहावीच्या निकालात मुलींची बाजी; 97.96 टक्के मुली उत्तीर्ण 

“राष्ट्रपती निवडणुकीसाठी मी काही डावपेच रचलेत, माझा अर्ज 100 टक्के जाणार”

“शरद पवारांशिवाय तगडा उमेदवार देशात उरलाय का?” 

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी! 

सर्वात मोठी बातमी; वाढत्या विरोधानंतर अग्निपथ योजनेत सरकारने केला मोठा बदल