जे भाजपमध्ये गेले ते पुन्हा राष्ट्रवादीत येतील; छगन भुजबळांना विश्वास

पुणे | भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बॉंडिंग आहे. भाजपमधील वातावरण त्यांना पटणं शक्य नाही, असा दावा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ते वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नवी मुंबई महापालिकेत आमच्या प्रयत्नांना यश येईल, असाही दावा भुजबळांनी केला आहे. भाजपमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. भाजपात गेलेल्या नेत्याचे शरद पवारांशी बॉंडिंग आहे. सरकार आल्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादीत येतील अशा चर्चा आहे, असा विश्वास छगन भुजबळांनी व्यक्त केला आहे.

भाजपला खिंडार लागेल की नाही हे माहिती नाही पण भाजपची सूज कमी होत आहे. भाजप अस्वस्थ आहे. अनेक सरकार येऊन गेली पण हे इतके का अस्वस्थ झालेत, त्यांची अस्वस्थता ही लोकांच्या दृष्टीने हास्यास्पद असल्याची टीका भुजबळांनी केली आहे.

दरम्यान, सत्तेचा ताम्रपट घेऊन आलात का? असा बोचरा सवालही भुजबळांनी केला आहे.

 महत्वाच्या बातम्या-

-औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन बड्या नेत्यांनी बांधलं शिवबंधन

-इंदोरीकरांच्या समर्थनार्थ निघणार टाळ मृदुंगाच्या गजरात मोर्चा!

-…तर आता कपडे काढून मला जावं लागेल- अजित पवारांची तुफान फटकेबाजी

-तृप्ती देसाईंनी केला इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल

-शिवसेनेने घेतले दोन मंत्र्यांचे राजीनामे???