औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन बड्या नेत्यांनी बांधलं शिवबंधन

मुंबई | औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आऊट गोईंग तर शिवसेनेत इनकमिंग सुरु झाल्याचं चित्र आहे. भाजप माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि माजी महापौर गजानन बरवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोघांना शिवबंधन बांधलं. औरंगाबाद महापालिका निवडणुकींच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

किशनचंद तनावाणी यांच्या शिवसेना प्रवेशापूर्वी भाजपच्या बड्या नेत्याने त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवून एकवेळ भेट घेण्याचं आवाहन केलं होतं. संभव हो तो जाने से पहले एक बार जरूर मिलन, असा मेसेज तनवाणींच्या मोबाईलवर दुपारी अडीच वाजता आला होता. मात्र भाजप नेत्याचा मेसेज डावलून तनवाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे.

दरम्यान, लवकरच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं तनवाणी यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-इंदोरीकरांच्या समर्थनार्थ निघणार टाळ मृदुंगाच्या गजरात मोर्चा!

-…तर आता कपडे काढून मला जावं लागेल- अजित पवारांची तुफान फटकेबाजी

-तृप्ती देसाईंनी केला इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल

-शिवसेनेने घेतले दोन मंत्र्यांचे राजीनामे???

-देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे मग मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना का नाही- शरद पवार