राज्यातील ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश या भागात गेल्या दीड महिन्यापासून तीव्र उष्णतेची लाट सुरु आहे.

कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी, विदर्भ आणि आसपासच्या परिसरात हवामान कोरडे राहून तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या दीड महिन्यापासून उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट सुरु आहे.

पुढील दोन दिवसांत 13 ते 14 एप्रिल दरम्यान या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूरच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीपिकांचे नुकसान झालंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

…अन् मॅच सुरू असताना टॉपलेस होऊन मैदानात घुसली महिला, पाहा व्हिडीओ 

“राज ठाकरेंनी स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा घ्याव्यात” 

“दिवा विझताना मोठा होतो, हे आज पुन्हा दिसलं” 

Raj Thackeray | “वारसा प्रबोधनकारांचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची” 

“शरद पवार संजय राऊतांना कुठे लटकवतील ना, कळणार सुद्धा नाही”