घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलीये. पुणे जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे घराबाहेर पडत असाल तर काळजी घ्या.

कोकणातील रायगड, रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवार वगळाता पुण्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत पालघर, ठाणे, मुंबई, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे.

धुळे नंदूरबार जळगाव जिल्ह्यात मात्र, हलका मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मराठवाड्यात जालना हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत शनिवारी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही येत्या तीन दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुणे शहरात शुक्रवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री मात्र काही भागात जोरदार सरी कोसळल्या. येत्या चार दिवसांत शहरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

शहरात रात्री साडेआठ वाजता केलेल्या नोंदीनुसार शिवाजीनगर येथे 4.3, लोहगाव येथे 1.8, तर मगरपट्टा येथे 2.5 मिमी पाऊस पडला. चिंचवड येथे 3.5 व लवळे येथे 8 मिमी पाऊस झाला.

महत्त्वाच्या बातम्या- 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती! 

“बाळासाहेबांचा आत्मा बघतोय वरून, तुम्ही त्यांना आपले म्हणाल पण… “ 

आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा मुलाला झटका 

अमरनाथमधील ढगफुटीचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर! 

‘गप्प बसून आराम करा’; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला