‘जाण्याआधी उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं होतं’; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

मुंबई | खरं तर सुरत जायच्या आधी मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. त्यांचा रिस्पॉन्स काही नव्हता, असं शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

सूरतमध्ये आमदारांची संख्या पाहिली. 29-30 होती. तिथल्या आमदारांची मानसिकता परत येण्याची नव्हती सत्तातरानंतरच मातोश्रीवर जाऊ अशी भूमिका होती, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

पहिल्यांदा वाटलं एकनाथ शिंदे बंड करत आहे पण प्रत्येक आमदारांच्या डोक्यात बंडाची प्रवृत्ती होती. सगळे विशेष व्यवस्था होती ती मनाला न पटणारी होती, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी शी बोलताना उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. तसेच, नव्या सरकारमध्ये असलेल्या मंत्रीपदाच्या अपेक्षेविषयीही बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली आहे.

बंडखोरी ही प्रत्येकात असली पाहिजे. बंडखोरीच माणसाला जिवंत ठेवते. गीता संस्कृतमध्ये होती. ती मराठीत करण्याचा उठाव ज्ञानेश्वरांनी केला. शरद पवारांनी 38 वर्षांत 38 आमदार फोडले आणि तिथे बंडखोरी केली. बंड कोण करत नाही?, असा सवाल बच्चू कडूंनी केला आहे.

आम्ही या बंडामागे पद मागत नाही. आम्हाला बरेच कार्यकर्ते म्हणतात की बजेटचं चांगलं पद मिळायला हवं. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम वगैरे. पण आम्ही म्हटलं सामाजिक न्याय विभाग द्या जिथे अपंगांची, दीन-दलितांची सेवा करता येईल, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती! 

“बाळासाहेबांचा आत्मा बघतोय वरून, तुम्ही त्यांना आपले म्हणाल पण… “ 

आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा मुलाला झटका 

अमरनाथमधील ढगफुटीचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर!