Rain Alert! विदर्भासह राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | सध्या राज्यभर थंडीची लाट सुरु आहे. सर्वत्र थंडीची लाट सुरु असताना अवकाळी पावसानंही (Rain) थैमान घातलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अशा अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आहे.

महाराष्ट्रात येत्या काही दिवसात हलका ते मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. अशातच अजूनही पावसाचा रोख थांबलेला नाही. काही भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. गडचिरोली आणि चंद्रपुर यां जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

गारपीटमुळे आधीच बागायतदार आणि खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

थंडीची लाट सुरु असतानाही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. अशातच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पु्न्हा एकदा पाऊस कोसळणार असल्याचं हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलं आहे.

अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे लोकांचे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे सगळचे हैराण झाले आहेत.

उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. या भागात काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचाही जोर वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसाठी हा काळ महत्त्वाचा असताना असा अचानकपणे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं सर्वांना चिंतेत टाकलं आहे.

दरम्यान, राज्यात सध्या उस तोडणी आणि इतर पिकांचा हंगाम चालू आहे. अशात जर पावसानं आगमन केलं तर शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कोरोनाला दूर ठेवायचंय! व्यायामाचे ‘हे’ 5 प्रकार घरच्या घरी करा

“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

 ‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया

  महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार

  ‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल