उदयनराजे भाजपत प्रवेश करणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात…

नागपूर | उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण ते भाजपमध्ये आल्यास आनंदच होईल. त्यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा सुरू आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय.

पक्षप्रवेशाचं माहित नाही, मी सांगली-कोल्हापूरच्या पुराबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. 

दरम्यान, उदयनराजेंनी भाजपत प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या-