छगन भुजबळांवर गुन्हा दाखल झाला होता तेव्हा कुठे होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते??- चंद्रकांत पाटील

पुणे |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांवर गुन्हा दाखल झाला होता तेव्हा कुठे होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते?, असा सवाल उपस्थित करत पवारांवर टीका केली आहे.

आकसाने कारवाई केली म्हणून निदर्शने करणारे छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता तेव्हा कुठे होते?? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ईडी कार्यालयात जाण्याचा शरद पवारांनी इव्हेंट केला, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

या देशात कम्पलेंट्स करण्याचे फोरम ठरलेले आहेत. अन्याय झाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, असा सल्लाही त्यांनी पवारांना यावेळी दिला.

दरम्यान, शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याचे समजताच राज्यातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईकडे धाव घेतली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्तांच्या विनंतीला मान देऊन पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय पाठीमागे घेतला.

महत्वाच्या बातम्या-