अरे कशाला करताय बंगल्यांची दुरूस्ती… डागडुजी होण्याअगोदरच तुमचं सरकार पडणार- चंद्रकांत पाटील

उस्मानाबाद |  मंत्र्यांच्या बंगल्यावर ठाकरे सरकारकडून कोटींची उधळपट्टी करण्यात येत आहे. 31 मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजी आणि नुतनीकरणासाठी तब्बल 15 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. मात्र, यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

अरे तुम्ही किती दिवस राहणार आहात… तुमचे बंगले पूर्ण होण्याआधीच तुम्ही जाणार आहात. पण त्यासाठी तुम्ही किती खर्च कराल. टेंडरपण अजून काढलं नाही. उधळपट्टी चालू आहे. तसेच कमीतकमी वेळात जास्तीत जास्त ताटात ओढण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशा शब्दात पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आपण लोकांचे सेवक आहोत त्यामुळे आपण कमीत कमी सुविधा घ्यायला हवी. मी पाच वर्षात माझ्या बंगल्याचा रंगही बदलला नाही. मात्र, आज तुम्ही आज बंगल्याचं सर्व चित्र बदलत आहात. या सरकारची नुसती उधळपट्टी सुरु असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, दर पाच वर्षांनी ही डागडुजी करण्यात येते असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, केवळ पाच वर्षातच इतकी मोठी रक्कम बंगल्यावर खर्च करणे योग्य आहे का? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप ही राष्ट्रीय आपत्ती म्हणणाऱ्या पवारांना ट्वीट करून भाजपचा खडा सवाल!

-रितेश-जेनेलिया घेणार ‘व्हॅलेंटाईनदिनी ‘या’ प्रसिध्द राजकारणी जोडीची मुलाखत

-रितेश-जेनेलिया घेणार ‘व्हॅलेंटाईनदिनी ‘या’ प्रसिध्द राजकारणी जोडीची मुलाखत

-“शाहरूख खानसोबत तुलना हे तर माझं भाग्यच”

-…अन् धनंंजय मुंडे धावून गेले त्या जवानाच्या मदतीला