चंद्रकांत पाटलांनी घेतली पूरग्रस्त भागातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी

मुंबई : सांगली कोल्हापूरमध्ये गेल्या महिन्यात पावसाने भीषण पूरस्थिती ओढावली होती. त्यामुळे अनेकांचे कुटुंब संसार उघड्यावर पडले. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच सर्वस्व गमावलेल्या पालकांसमोर आपल्या मुलींचे विवाह कसे करायचे हा असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

मुलींच्या विवाहाचा प्रश्न स्थानिक नागरिकांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माडला. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यंदाच्या वर्षी ज्या मुलींचे विवाह होणार आहे, अशा सर्व मुलींच्या विवाहासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले.

नुकतंच मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे पूरग्रस्त भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेनंतर ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या या निर्णयानंतर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अनेक माता-पित्यांना दिलासा मिळणार आहे.

कोल्हापूर, सांगलीत सद्यस्थितीत पूर ओसरला असला, तरी संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदा होणाऱ्या मुलींच्या विवाहासाठी लागेल ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमात महाराष्ट्रतील सर्व दानशुर व्यक्तींनी मदत करुन सहभाग घ्यावा असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-