संजय बांगरच्या संतापाचा स्फोट; सिलेक्टरच्या रुममध्ये घुसून दमदाटी

मुंबई : टीम इंडियाचे बॅटिंग कोच संजय बांगर यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ स्थगित करण्यात आला आहे. पाच वर्षांच्या सेवेनंतर अविश्वासाचा ठपका ठेवण्यात आल्यामुळे बांगर यांच्या संतापाचा स्फोट झाला. दोन आठवड्यांपूर्वी संजय बांगर यांनी एका निवडकर्त्याच्या खोलीत घुसून वाद घातला होता, असा दावा केला जात आहे.

टीम इंडियाचे राष्ट्रीय सिलेक्टर देवांग गांधी यांच्या रुममध्ये घुसून संजय बांगर यांनी आगपाखड केली होती, असं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने छापलं आहे. ‘दोन आठवड्यांपूर्वी संजय बांगर टीम इंडियाच्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांच्या रुममध्ये घुसले. फलंदाजी प्रशिक्षकपदावरुन आपल्याला हटवल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.’ असं या वृत्तात म्हटलं आहे.

निवड समिती मुलाखत घेत असताना संजय बांगर यांनी रुमचा दरवाजा ठोठावला आणि समितीला चांगलंच सुनावलं. संपूर्ण भारतीय संघ आपल्या पाठीशी उभा राहील आणि मला हटवण्याचा तुमचा निर्णय तुमच्याच अंगलट येईल, असंही बांगर यांनी सांगितल्याचं म्हटलं जात आहे. 

संजय बांगर यांच्या वर्तणुकीमुळे ‘बीसीसीआय’ही नाराज आहे. याविषयी प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांच्या कानावर घालण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-