बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का??- चंद्रकांत पाटील

उस्मानाबाद |  महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का? असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची खिल्ली उडवली आहे. तसंच थोरातांनी मंदी म्हणजे काय हे समजावून घेणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

एका देशातून दुसऱ्या देशात मंदी कधीच जात नसते. जगभर मंदी असते म्हणून थोरातांनी मंदी काय असते हे अगोदर समजावून घ्यावी, अशी खोचक टीका पाटील यांनी केली आहे.

ठाकरे सरकार काम करणारं सरकार आहे की अगोदरच्या कामांना स्थिगिती देणारं सरकार आहे हेच मला कळत नाही. मी सरकार पडू द्या, अशी नकारात्मक प्रार्थना करणार नाही. आपोआपच हे सरकार पडणार आहे, अशी भविष्यवाणीही पाटील यांनी वर्तवली.

दुसरीकडे बंगल्यावर जास्त खर्च करू नका कारण तुम्हाला त्या बंगल्यात रहायला किती दिवस मिळणार आहे. डागडुजी होईपर्यंत तुमचं सरकार पडेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-

-रितेश-जेनेलिया घेणार ‘व्हॅलेंटाईनदिनी ‘या’ प्रसिध्द राजकारणी जोडीची मुलाखत

-“शाहरूख खानसोबत तुलना हे तर माझं भाग्यच”

-…अन् धनंंजय मुंडे धावून गेले त्या जवानाच्या मदतीला

अरविंद केजरीवालांच्या शपथविधीची तारीख ठरली अन् मैदानही ठरलं!

-मराठवाड्याच्या पाणी योजनेवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!