पुणे महापौरांच्या पाठीवर चंद्रकांतदादांची कौतुकाची थाप तर अजित पवारांना मात्र झिरो मार्क

पुणे |   पुण्यात कोरोनाची संख्या वाढत असताना तसंच मुंबईखालोखाल पुण्याची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अतिशय व्यवस्थित परिस्थिती हाताळली, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोहोळ यांच्या पाठीवर कौतुकांची थाप मारली आहे. मात्र पालकमंत्री अजित पवार यांच्यावर ते काहीशे नाराज असलेले पाहायला मिळाले. अजित पवार यांना त्यांनी झिरो मार्क दिले.

अजित दादांचा स्वभाव पाहता त्यांनी कोरोनाच्या या कठीण काळात धडाधड निर्णय घेणे अपेक्षित होतं. मात्र त्यांनी या काळात जनतेची तसंच आमची देखील निराशा केली, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दुसऱ्या काळाच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामाची व कोरोना आपत्तीत केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी तिरकस प्रतिक्रिया दिली. हा सर्व्हे कुणी केलाय ते मला अगोदर पहावं लागेल. आमचं ज्या राज्यात सरकार आहे तिथे आणि केंद्रात आम्हीच एक नंबर आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात आज 2436 जणांना कोरोनाची लागण; पाहा तुमच्या भागात किती?

-भारतात कोरोनामुळे गेल्या चार दिवसात झालेल्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक

-‘या’ एमआयडीसीमध्ये हजारोंना रोजगारांची संधी; उद्योगमंत्र्यांनी दिली खुशखबर

-अमेरिकेनंतर आता ‘हा’ देश ठरतोय कोरोनाचं नवं हॉटस्पॉट; अक्षरशः थैमान सुरु

-रायगडच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताच मुख्यमंत्र्यांची लगोलग 100 कोटींची घोषणा