मुंबई | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण म्हणजे #शिवराज्याभिषेक दिन, असं म्हणत त्यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी राज्य कारभार जगात आदर्श मानला जातो. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून पुढे जाऊ या. शिवप्रभुंनी दिलेला हा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध होऊ या. हे वचन त्यांच्या चरणी अर्पण करू या, असं मुख्यमंत्री म्हणाले.
रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन!, आपण त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया असं म्हणत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी त्रिवार मुजरा केला.
दुसरीकडे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं. छत्रपतींनी घालून दिलेला आदर्श सदैव प्रेरणा देत राहिल, असं ते म्हणाले. राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचं द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, असं ते म्हणाले.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा! महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण म्हणजे #शिवराज्याभिषेक दिन.या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 6, 2020
महत्वाच्या बातम्या-
-पुणे महापौरांच्या पाठीवर चंद्रकांतदादांची कौतुकाची थाप तर अजित पवारांना मात्र झिरो मार्क
-राज्यात आज 2436 जणांना कोरोनाची लागण; पाहा तुमच्या भागात किती?
-भारतात कोरोनामुळे गेल्या चार दिवसात झालेल्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक
-‘या’ एमआयडीसीमध्ये हजारोंना रोजगारांची संधी; उद्योगमंत्र्यांनी दिली खुशखबर
-अमेरिकेनंतर आता ‘हा’ देश ठरतोय कोरोनाचं नवं हॉटस्पॉट; अक्षरशः थैमान सुरु