“सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेलाय, राज्यात सगळा सत्यानाश सुरुय”

मुंबई | राज्यात मनमानी कारभार सुरु आहे.कोरोनाबाबतच्या नियमावली बनावट असताना राज्य सरकारने विरोधकांना विचारात घेतले नाही, असा आरोप भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

कोरोना वाढत असताना एकही तज्ज्ञाला तुम्ही बी बोलू देत नाही. त्यांना बोलू द्या. त्यांनी सांगूद्या की बाबानो काळजी घ्या . काळजी करण्यासारख काही नाही परंतु काळजी घेण्यासारखं बरंच काही आहे.

सदाभाऊ खोत, गोईपीचंद पडळकर हे आमचे रांगडे नेते आहेत. ते त्यांच्या पद्धतीने बोलतात. सरकारला पोटापेक्षा नशेची जास्त पडली आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कोरोना हाय पिकला असताना यांनी दारूची होम डिलिव्हरी दिली. डिलिव्हरी द्यायचीच आहे तर ती पिझ्झाची द्या असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.

पेट्रोल , डिझेल वरील व्हॅट कमी करायचा नाही, अन दारूवरचा करायचा. सरकारने विरोधी पक्षांना नाही किमान स्वतःचे चार नेते एकत्र बसवून एकमताने एका निर्णय घेतला पाहिजे मला गेंड्याची भाषा कळते थोडी, तोही भेटून मला म्हणाला अरे मी थोडा जास्त संवेदनशील आहे. तुम्ही आता दुसरा प्राणी शोधा कारण माझ्या पेक्षाही कमी संवेदनशील लोक आहेत, असा टोला सरकारला लगावला.

सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आहे. कधी शाळा सुरु करता, कधी बंद करता, कधी व्हर्च्युअल म्हणता , कधी परीक्षा व्हॅच्युअल म्हणता हा सगळा सत्यानाश चालला आहे. शंभर लोकांच्या मुलाखती घेतल्यातर तुम्हाला सत्यानाश सुरु आहे हे उत्तर देतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

राज्य सरकारने सर्वांसोबत बसून एकमताने निर्णय घेणे अपेक्षित आहे. राजेश टोपे जालन्यात एक बोलणार , अजित दादा शुक्रवारच्या बैठकीत एक बोलणार, यासगळ्या मध्ये कोरोनाला सिरिअसली घेऊ नका असं नाही, पण दुसऱ्या बाजूला घाबरवू पण नका असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 50 लाख 

राज्यातील दारूची दुकानं बंद होणार?; राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

सिंधुताईंच्या ‘त्या’ इच्छेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; घेतला मोठा निर्णय

पालकांनो मुलांची काळजी घ्या! कोरोनाबाधीत मुलांना ‘या’ आजाराचा अधिक धोका

‘ठाकरे सरकार गेंड्यापेक्षा जास्त असंवेदनशील’;चंद्रकांत पाटील संतापले