“ममता बॅनर्जी यांना गोव्यातील सत्तेचं स्वप्न पडतंय, हे त्यांच्या प्रतिमेस शोभणारं नाही”

मुंबई | गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनाही मैदानात उतरणार आहे. महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महत्वाच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

सामनामधून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि आपदेखील अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना ममता बॅनर्जींना देखील टोला लगावला आहे.

सामनामधील रोखठोक सदरामधून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना सुनावलंय. अस्थिर लोकांना घेऊन ममता बॅनर्जी यांना गोव्यातील सत्तेचं स्वप्न पडतंय, हे त्यांच्या प्रतिमेस शोभणारं नाही अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

आता तृणमूलच्या खांद्यावर बसून भाजपला गोवा पुन्हा जिंकायचं आहे. तृणमूल काँग्रेस व आपसारखे पक्ष गोव्यात येऊन पैशांचा वारेमाप वापर करतात. गोव्याची संस्कृती आणि पर्यावरण आधीच बिघडलं. त्यात पैशांचा पाऊस सुरू झाल्याने सगळंच बिघडलं, असं त्यांनी म्हटलंय.

गोव्यात तृणमूल काँग्रेस येण्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल. त्यामुळेच गोव्यात तृणमूलची हवा करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळण सुरू आहे. या पैशांचे धनी तृणमूल नसून दुसरंच कोणी तरी असावेत, असंही सांगणारे अनेक जण भेटले, असं त्यांनी म्हटलंय.

गोव्यातली निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, पण तृणमूल काँग्रेस व ‘आप’सारख्या पक्षांनी काँग्रेसच्या वाटेत काटे पेरून भाजपला मदत केली आहे. तृणमूल आणि आपसारख्या पक्षांनी गोव्याच्या मतदारांना फक्त सोन्याने मढवायचंच बाकी ठेवलं, असा टोलाही त्यांनी सामनातून लगावला आहे.

‘आप’ने तर सगळेच मोफत द्यायचं ठरवलं. श्री. अरविंद केजरीवाल गोव्यात आले. मोठया सभा घेतल्या. दिल्लीत पोहोचेपर्यंत त्यांना कोरोनाने गाठलं. आप आणि तृणमूलचे लक्ष ख्रिश्चन मतांवर आहे. पण ख्रिश्चनांची मते काँग्रेसच्या पारडय़ात पडतील, असं राऊतांनी सांगितलं.

गोव्यातले राजकारण आज सोपे राहिलेले नाही. प्रत्येकाने गोव्याची राजकीय प्रयोगशाळा केली आहे. मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मोठे नेते. त्यांच्या मागेही गोवा पूर्णपणे उभा राहिला नाही. तडजोडी करूनच त्यांना सत्ता स्थापन करावी लागली. आता मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकर गोव्याच्या राजकारणात उतरला. त्याला उमेदवारी द्यायला भाजप तयार नाही. उत्पल तरीही निवडणूक लढेल. तेव्हा भाजप पोस्टरवर मनोहर पर्रीकरांचे छायाचित्र कसे वापरणार? त्यामुळे उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्याशिवाय भाजपास पर्याय नाही, असं राऊत म्हणाले.

गोव्याच्या राजकारणात पैशांचा खळखळाट सुरूच आहे. सगळेच भ्रष्ट, व्यभिचारी बनले. देवळांत आणि चर्चमध्ये फक्त घंटा वाजतात. त्या घंटांचे मांगल्यच संपलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 50 लाख 

राज्यातील दारूची दुकानं बंद होणार?; राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

सिंधुताईंच्या ‘त्या’ इच्छेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; घेतला मोठा निर्णय

पालकांनो मुलांची काळजी घ्या! कोरोनाबाधीत मुलांना ‘या’ आजाराचा अधिक धोका

‘ठाकरे सरकार गेंड्यापेक्षा जास्त असंवेदनशील’;चंद्रकांत पाटील संतापले