उद्धवजी परिस्थिती हाताबाहेर जातीये, पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात आहे ना?- चंद्रकांत पाटील

मुंबई |  कोरोनाविरोधातला लढा आता तीव्र झालाय. लॉकडाऊन जाहीर करूनही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावरूनच टोमणा मारला आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांची दिवसागणिक वाढणारी संख्या अतिशय चिंताजनक आहे. उद्धवजी परिस्थिती हाताबाहेर जात आहे. निदान आपल्या सरकारमधील पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात आहे ना? असा सवाल विचारत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला आहे.

दुसरीकडे कोरोनाग्रस्त वाढू नये म्हणून शासन पुरेपूर प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री दररोज यंत्रणांशी संपर्क साधून घटनांचा आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

दरम्यान, राज्य शासन उत्तमपणे काम करत असताना केंद्र शासन तसंच महाराष्ट्र भाजप डिवचण्याच्या प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्यावर सोपवली आहे. यानंतर या चर्चांना सुरूवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-पहिला देश, बाकी सारं नंतर; रोहित शर्माचं अभिमान वाटावं असं उत्तर

-‘बाहुबली’चा देशासाठी मदतीचा हात; 4 कोटींची केली मदत

-कोरोनाच्या संकटात देव धावले मदतीला, साईबाबा आणि अंबाबाई मंदिराची सरकारला भरघोस मदत

-सध्या पोलिस यंत्रणेवर खूप ताण पडतोय… मला सुरक्षा नको- चंद्रकांत पाटील

-माझा फोन लागला नाही असं कधीच होत नाही- शिवाजी आढळराव पाटील