बारामतीच्या काटेवाडीत युवकांनी खाकी वर्दीवरच टाकला हात, ‘या’ कारणामुळे स्टम्पनं मारलं

बारामती | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील काटेवाडीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटचा खेळ रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला स्टम्पच्या सहाय्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

राज्यावर सध्या कोरोनाचं भीषण संकट आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र ही संचारबंदी मोडणारे अनेक हुल्लडबाज सध्या अवतीभवती दिसून येत आहेत. अशाच हुल्लडबाजांना आवरणाऱ्या पोलिसावर हल्ला करण्यात आला आहे.

काटेवाडीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना पोलीस कर्मचारी पी. एस. कवितके यांनी विचारणा केली. यावरुन कवितके यांना स्टम्पच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव म्हणून काटेवाडी गावाची ओळख आहे, त्यांच्या गावातच ही घटना घडल्याने या प्रकाराची सध्या एकच चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या –

-पहिला देश, बाकी सारं नंतर; रोहित शर्माचं अभिमान वाटावं असं उत्तर

-‘बाहुबली’चा देशासाठी मदतीचा हात; 4 कोटींची केली मदत

-कोरोनाच्या संकटात देव धावले मदतीला, साईबाबा आणि अंबाबाई मंदिराची सरकारला भरघोस मदत

-सध्या पोलिस यंत्रणेवर खूप ताण पडतोय… मला सुरक्षा नको- चंद्रकांत पाटील

-माझा फोन लागला नाही असं कधीच होत नाही- शिवाजी आढळराव पाटील