“देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या आणि जेवण घ्या”

नांदेड | देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री ही अनोखी ऑफर दिली आहे. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितलंय.

या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं. पाटील यांच्या गाव जेवणाच्या ऑफरमुळे ते चांगलेच चर्चेत येण्याची शक्यता आहे. तसेच सध्या देगलूर-बिलोली विधानसभेत पाटील यांच्या ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

सांगली महापालिकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा शॉक द्या, तुम्हाला सोन्याचा मुकुट घालेन, अशी ऑफर याआधी चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यांनी आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना ऑफर दिली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे आगामी काळात पोटनिवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथील राजकारण तापलं आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

आज 1 वाजता लागणार इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परिक्षांचा निकाल!

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये मोठा बदल, पाहा आजचा दर

“राहुल गांधी यांना ड्रग्जचं व्यसन, ते तस्करी देखील करतात”

“सामान्य माणसाला अच्छे दिन यावे, महागाई नसावी हेच नरेंद्र मोदींचं ध्येय”

अजित पवारांना या छाप्यांनी फारसा पडणार नाही- रामदास आठवल