‘हिंमत असेल तर…’; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान

मुंबई | विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला, बुलढाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झालेत.

हिंमत असेल तर महाविकास आघाडीने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने घ्यावी, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

भाजपला मुंबई आणि अकोला, बुलढाणा, वाशिम या जागा नव्याने मिळाल्या आहेत. सदस्य म्हणून अपात्र ठरण्याच्या भितीने ते त्या त्या पक्षासोबत राहत असले तरी गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भाजपला मतदान केलं, असं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचा विकास होणार नाही याची या लोकप्रतिनिधींना विशेषतः शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जाणीव आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीये.

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आमदारांच्या गुप्त मतदानाने करावी, असा विधानसभेचा मूळ नियम आहे आणि तसा प्रघातही आहे. आघाडीला आपल्याच आमदारांची खात्री नसल्याने नियम बदलून आवाजी मतदानाने निवडणूक करण्याचा प्रयत्न चालू आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपने सहकार्य केल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही विधान परिषद निवडणूकही बिनविरोध करावी असं ठरलं होतं. त्यासाठी आम्ही कोल्हापूरमध्ये उमेदवार मागे घेतला, पण काँग्रेसने ठरल्याप्रमाणे पूर्ण सहकार्य केलं नाही. त्या पक्षाने नागपूरच्या जागेवर निवडणुकीचा आग्रह धरला आणि अखेरीस पोरखेळ केला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीये.

आपलं महाविकास आघाडीला आव्हान आहे की, त्यांनी मूळ नियमानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी आणि आमदारांना गुप्त मतदानाची मुभा द्यावी, मग त्यांना कळेल की अध्यक्ष कोण होतो?, असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

St worker strike | अनिल परब अॅक्शन मोडमध्ये; उचललं मोठं पाऊल 

सोशल मीडियावर जॉन अब्राहमने उचललं धक्कादायक पाऊल! 

“पत्नीने सेक्सला नकार दिल्यास दुसऱ्या महिलेसोबत सेक्स करण्याचा पतीला अधिकार” 

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा भाजपच्या त्या ’12’ आमदारांना जोरका झटका 

अँटालिया प्रकरणावर राज ठाकरे म्हणाले,’…हे मी आधीच सांगितलं होतं’