मुंबई | परिवहन मंत्री अनिल परब अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय. काही कर्मचारी जरी कामावर हजर झाले असले तरी काही कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे.
सोमवारपर्यंत कामावर हजर व्हा अन्यथा अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता. त्यानंतरही कामगार कामावर राहिले नाहीत. त्यानंतर राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे.
निलंबित केलेल्या 10 हजार कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस देणार आहेत. सेवेतून बडतर्फ का करू नये? यासाठी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटीसीनंतर संपावरील कर्मचाऱ्यांना 8 दिवसांची मूदत देण्यात येणार आहे.
20 तारखेला कोर्टाची तारीख आहे, त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल. मात्र आत्ता उगाच एसटी कर्मचाऱ्यांना भडकवले जात आहे, असं अनिल परब म्हणालेत.
दिशाभूल करून संप भरकटत आहे. विलीनीकरणाचा मुद्दा समितीच्या माध्यमातूनच सुटणार आहे. पण तोपर्यंत कामावर या असं आवाहनही परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा केलं आहे.
गेला दीड महिना उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. काही कर्मचारी जरी कामावर हजर झाले असले तरी काही कर्मचारी अजूनही संपावर आहेत. संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आजपासून शो कॉज नोटीस देण्यास सुरुवात केल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारात विलीनीकरण ही एसटी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. त्याबाबत एक समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल 20 जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल, अशी चिन्हे आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सोशल मीडियावर जॉन अब्राहमने उचललं धक्कादायक पाऊल!
“पत्नीने सेक्सला नकार दिल्यास दुसऱ्या महिलेसोबत सेक्स करण्याचा पतीला अधिकार”
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा भाजपच्या त्या ’12’ आमदारांना जोरका झटका
अँटालिया प्रकरणावर राज ठाकरे म्हणाले,’…हे मी आधीच सांगितलं होतं’
महाविकास आघाडीचं सरकार पडेल का?, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य