महाराष्ट्र मुंबई

“नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण…”

मुंबई | नाथाभाऊंनी आम्हाला मुक्ताईनगरात नेऊन दोन थोबाडीत माराव्या, पण त्यांनी घरची भांडणं जगासमोर आणू नयेत, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना केलं.

नाथाभाऊंसाठी तिकीट हा क्षुल्लक विषय आहे. त्यांची पक्षाशी नाळ जोडली गेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि नाथाभाऊ यांचं सविस्तर बोलणं झालं आहे. जर लॉकडाऊन नसता तर मी स्वत: चारवेळा मुक्ताईनगरला गेलो असतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

नाथाभाऊ हे मुरलेले हुशार राजकारणी आहेत. ते बुडत्या जहाजात बसणार नाहीत. काँग्रेसने त्यांना ऑफर दिली तर मग पहिली सीट का नाही दिली? त्यांनी सहाव्या जागेची का ऑफर दिली?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

नाथाभाऊंना पक्षाकडून खूप मिळालं. अजून मिळायला हवं. पण मिळालं नाही म्हणून लगेच पक्ष सोडण्याची भाषा करु नये, ते आमचे मार्गदर्शक आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधानांना जर ठोस काही सांगायचं नसेल तर गोंधळाचं वातावरण कशाला निर्माण करता?; आंबेडकरांची टीका

-आर्थिक पॅकेजची घोषणा पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात

-२० लाख कोटी लिहायचं तर अर्थमंत्र्यांनी लिहिलं २० लाख, नंतर…

-‘…तर खडसेंचं निश्चित स्वागत करु’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून एकनाथ खडसेंना खुली ऑफर

-तुमच्या प्रेमाला कधीच विसरणार नाही; ‘या’ दोघांसाठी अमोल मिटकरींची भावनिक पोस्ट