“2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल”

मुंबई | मुंबईत 2022 ची महापालिका निवडणूक ही भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल. ही निवडणूक जिंकणं हे आमच उद्दिष्ट आहे. त्यामुळे अत्यंत बारकाईने या बैठकीत चर्चा केली. मुंबईचा पुढील महापौर हा भाजपचाच असेल, असा संकल्पही या बैठकीत केला आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

गेल्या एक महिना हा राज्यातील सत्तास्थापनेमध्ये गेला. त्यानंतर आम्ही विभागावर जिल्ह्यातील संघटनात्मक रचना कशी होईल याबाबत बैठका केल्या. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई शहराची बैठक झाली. मुंबईत एकूण 36 विधानसभा आहे. त्याचे आम्ही लोकसभेप्रमाणे 6 जिल्हे केले आहेत. तर मुंबईत एकूण 227 वॉर्ड आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुंबईत एकूण 10 हजार बुथ आहेत. त्यामुळे प्रत्येक बुथ घेऊन आम्ही त्यावर बुथ समिती, वॉर्ड अध्यक्ष यावर चर्चा केली. ही सर्व चर्चा येत्या 30 डिसेंबरपर्यंत संपेल. त्यानंतर काही ठिकाणी फेरनियुक्ता तर काही ठिकाणी नवीन नियुक्ती होईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, येत्या 1 ते 5 जानेवारीपर्यंत प्रदेशाध्याची घोषणा होईल. यानंतर केंद्रीय अध्यक्षासाठीचं वेळापत्रक लागेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-