‘सरसकट’ म्हणता मग कर्जमाफीसाठी निकष का लावता?- चंद्रकांत पाटील

मुंबई | ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निकषांच्या मुद्द्यावर आमच्या कर्जमाफीवर आक्षेप घेतला जात होता. पण सरसकट शब्द असताना कर्जमाफीला निकष का लावले?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फसवत आहे. काँग्रेस नेत्यांच्या साखर कारखान्यावरील जे दोनशे कोटीचं कर्ज आहे ते  वाचवण्यासाठी ही कर्जमाफी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

सातबारा कोरा करु, मला शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत, अशी आश्वासनं उद्धव ठाकरेंनी दिली होती. सरसकट कर्जमाफी करु म्हणणाऱ्या ठाकरेंनी शेतकऱ्यांना फसवलं, असंही ते म्हणाले आहेत.

2001 ते 2016 पर्यंतची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मागच्या सरकारने केली. निकष लावले म्हणून आमच्यावर ओरडायचे. निकष लावणे आवश्यक आहे. पण आम्ही निकष लावले तर चूक आणि तुम्ही लावले तर बरोबर, असं कसं होईल, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-