“विश्वजीत कदमांनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी घ्यावी”

पुणे | जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्या वादात मंत्री विश्वजीत कदम यांनी उडी घेतली होती. आता चंद्रकांत पाटील यांनी विश्वजीत कदमांना जास्त बोलायला लावू नका नाहीतर तुम्हाला महागात पडेल, असा थेट इशारा दिला आहे. मंत्री जयंत पाटील यांची बाजू घेत विश्वजीत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.

जो शिशों के घरो मे रहते है, वो दुसरोंके घरो पे पत्थर फेका नही करते. महापुराच्या काळात भाजपने जनतेला काय मदत केली, हे सर्वांना माहिती आहे. चंद्रकांतदादांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणं चुकीचे आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

विश्वजीत कदम यांनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी आपल्या स्वत:च्या अमाप साम्राज्याची काळजी घ्यावी. सांगलीत पूर आला त्यावेळी आपण काय केले?, असा सवाल विचारला. तसंच सांगली कोल्हापूरच्या पुरात आम्ही काय केलं याची जनता साक्षीदार असल्याचं म्हटलं.

संपूर्ण देश आणि राज्य कोरोनाच्या महाभयानक स्थितीचा सामना करत असताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम सांगलीत काय करत आहेत? याचं त्यांनी उत्तर द्यावं. लॉकडाऊनच्या कठीण काळात भांडाऱ्याचे पालकमंत्री असताना तिथे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर प्रोफाईलचा फोटो बदलला, ठेवला मास्क लावलेला फोटो

-नरेंद्र मोदींनी सांगितली सप्तपदी… नागरिकांना सूचना पाळत साथ देण्याचं केलं आवाहन

-अन्य देशांच्या तुलनेत भारतात ३० टक्के केसेस कमी आहेत – नरेंद्र मोदी

-पंतप्रधानांची मोठी घोषणा; देशामध्ये 3 मे पर्यंत लॉकडाऊन

-‘काँग्रेस हा विना शीर आणि पायांचा पक्ष’; या अभिनेत्याची बोचरी टीका