रोज उठून पक्षाविरोधात कारवाई करत असाल तर गय केली जाणार नाही- चंद्रकांत पाटील

सोलापूर |  रोज उठून पक्षाविरोधात कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. अडचणी येत असतील तर त्या सोडवल्या जातील, असंही पाटील म्हणाले आहेत.

गुरुवारी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथगडावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच चंद्रकात पाटील यांनीही यावेळी भाषण केलं. त्यांनतर सोलापूरात बोलताना पाटलांनी पंकजा मुंडेंवर टीका केली आहे.

पंकजांनी सांगितलं की अनेकांनी बंड केले त्यामुळे इतिहास घडला. मात्र, बंड हे आपल्या लोकांविरोधात करायचे नसते. आपल्या लोकांसोबत चर्चा करुन मार्ग काढायचा असतो, अशी टीका त्यांनी केली आहे.

सोलापूरात कार्यकर्त्यांशी बोलताना पाटलांनी इशारा दिला आहे. पक्षाविरोधात कारवाई करु नका. सध्याचे वातावरण वेगळं आहे. तुम्हाला शिक्षा दिली जाऊ शकते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-